शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट: खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:47 IST

गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुणेपुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून, गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. नुकताच खेड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या गेटसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेत कैलास अनिल तांबे यांच्या डोक्याला गंभीर मार बसला असून जबडा फ्रॅक्चर झाला आहे. अजित अनिल तांबे आणि इतर काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंत्राटावरून वाद सुरु झाला, त्यानंतर दोन गट आमनेसामने 

ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. फिर्यादी व त्यांचे सहकारी हुंडाई कंपनीच्या गेटवर असताना आरोपी दुर्गेश गाडे, अभिजित उर्फ बड्या बोहाडे, शुभम मोदगेकर, आकाश पाचाण, ऋषिकेश पवार आणि त्यांचे साथीदार यांनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी हल्ला केला. कैलास तांबे यांच्या वाहनांचा कंपनीशी करार आहे, तर त्यांचे भाऊ अजित तांबे कंपनीत पाण्याचे जार पुरवतात. २८ फेब्रुवारीला अजित तांबे पाण्याचे जार पुरवण्यासाठी गेले असताना, अचानक १२-१३ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी “तुम्ही खाली काम मागायला येऊ नका, अन्यथा ठार मारू” अशी धमकी दिली.

BNS 2023 अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

खेड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 118(2), 189(2), 190, 191(1), 191(2), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच..!

गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक क्षेत्र, बिल्डर लॉबी, कंत्राटी वाद, टोळी युद्ध यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या कैलास तांबे यांच्यावर गंभीर उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत, मात्र अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का?

पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन व पोलीस विभागाने अशा टोळीधारकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुणे जिल्हा गुन्हेगारीचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त होत आहे. एका कंपनीच्या कंत्राटावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी होण्याच्या घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज

खेड औद्योगिक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. औद्योगिक कंपन्यांच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवली जावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांनी या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटक