शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार

By किरण शिंदे | Updated: February 27, 2026 17:21 IST

पोलिसांनी तातडीने पथक तयार करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला लातूर येथून अटक करण्यात आली.

पिंपरी -  अवघ्या २० रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली. या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत लातूर येथून अटक केली.घटना नेमकी काय?पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड आणि सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हे दोघे एकमेकांचे परिचित व मित्र होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेला आणि “माझे तुझ्याकडे २० रुपये उधार आहेत” असे म्हणत संतापाच्या भरात सत्यजितने धारदार शस्त्राने रवींद्रच्या गळ्यावर वार केला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत रवींद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांची तत्पर कारवाईघटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी सत्यजित कांबळे हल्ल्यानंतर फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने पथक तयार करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला लातूर येथून अटक करण्यात आली.मैत्रीचे नाते झाले रक्तरंजितरवींद्र आणि सत्यजित हे रोज एकत्र उठबस करणारे मित्र होते. त्यांच्या मैत्रीची उदाहरणे परिसरात दिली जायची. मात्र अवघ्या २० रुपयांच्या कारणावरून मित्राने मित्राच्या जीवावर उठल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समाजात वाढती हिंसा चिंताजनकअत्यंत क्षुल्लक कारणावरून घडलेली ही घटना समाजातील वाढत्या हिंसेचे द्योतक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shaken: Argument over ₹20 Debt, Friend Stabs Neck

Web Summary : Pimpri-Chinchwad was shocked as a dispute over ₹20 led to a friend stabbing another's neck. The suspect was arrested in Latur. The victim is hospitalized in critical condition. The incident highlights growing societal violence.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या