पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून चोरट्यांनी एका महिलेची ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ८ जणांविरोधात चंदननगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगावशेरी परिसरात राहायला आहे. महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाेव्हेंबर २०२४ मध्ये नावनोंदणी केली होती. नावनोंदणी केल्यानंतर चोरट्यांनी महिलेशी संपर्क साधून लग्नाबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला एकाने जाळ्यात ओढले. वेगवेगळी कारणे देऊन चोरट्याने महिलकेडून पैसे मागण्यास सुरुवात केली.
महिलेने खातरजमा न करता दीड वर्षात चोरट्याच्या खात्यात ५९ लाख ३७ हजार रुपये जमा केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. या प्रकरणात महिलेने ८ जणांविरोधात दिलेल्या फिर्यादीत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेदेखील म्हटले आहे. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल नंबर बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे करत आहेत.
Web Summary : A Pune woman lost ₹59.37 lakhs to online scammers posing as potential grooms on a matrimonial site. Police have registered a case against eight individuals after the woman reported being threatened when she inquired about the marriage. The investigation is ongoing.
Web Summary : पुणे की एक महिला को विवाह वेबसाइट पर संभावित दूल्हों के रूप में पेश करने वाले ऑनलाइन धोखेबाजों ने 59.37 लाख रुपये का चूना लगाया। महिला द्वारा शादी के बारे में पूछताछ करने पर धमकी दिए जाने की शिकायत के बाद पुलिस ने आठ लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। जांच जारी है।