शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:41 IST

गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

पुणे : शहरातील बोपोडी, औंध रोड आणि येरवडा परिसरात जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत चतु:शृंगी, येरवडा आणि खडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिन्ही घटनांत रस्त्यावरून निघालेल्या तरुणांकडील मोबाइल आणि इतर ऐवज चोरट्यांनी हिसकावला आहे.गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. याबाबत तन्वीर सय्यद (२६, रा. खडकी) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जून रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास फिर्यादी स्पायसर कॉलेजसमोरील रस्त्यावरून चारचाकीतून निघाले होते. तेव्हा आरोपींनी गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून फिर्यादीला थांबवले. त्यानंतर धक्काबुक्की करून फिर्यादीच्या हातातील ६० हजारांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात निघून गेले. याबाबत सय्यद यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.दोघा चोरट्यांनी मोबाइल हिसकावून पळ काढलाघटनेत व्हिडीओ कॉलवर पत्नीशी बोलत असताना तरुणाच्या हातातील मोबाइल दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना सोमवारी (दि. २३) सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. याबाबत ओमकार खेळगे (२७, रा. टिंगरेनगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी हे मूळचे लातूर येथील आहे. सोमवारी सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास ते आपल्या पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलत येरवडा येथील कॉमर झोन परिसरातून पायी निघाले होते. तेव्हा दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे त्यांच्या उजव्या बाजूने आले. त्यांनी फिर्यादीच्या हातातील मोबाइल हिसकावून कॉमर झोनच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकी आडवी घालून थांबवले अन् शस्त्राच्या धाकाने लुटले...चारचाकीमधून निघालेल्या एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश पाटील (२७, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मंगळवारी (दि. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी हे चारचाकी वाहनातून निघाले होते. बोपोडी मेट्रो स्थानकाखाली दोघा दुचाकीस्वारांना त्यांच्या चारचाकीला दुचाकी आडवी घालून थांबवले, तसेच दुचाकीला कट का मारला? अशी विचारणा करून फिर्यादी यांना हाताने मारहाण केली, तसेच चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या कानातील दीड ग्रॅम वजनाची बाळी चोरून तिथून निघून गेले. पोलिस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.धक्का मारून हातचलाखीने रोकड चोरलीलघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला धक्का मारून तुम्हाला काय लागले का? असे म्हणून हातचलाखीने २० हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी अहिल्यानगर येथील अरबाज खान (२७) या तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार सोमवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रोडवर चंदननगर परिसरात घडला. खान हा कारने सहकाऱ्यांसोबत निघाला होता. लघुशंकेसाठी तो चंदननगर परिसरात थांबला असता, आरोपीने धक्का देऊन हातचलाखीने त्याच्या खिशातील रोकड चोरी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी