बारामती: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ९७ हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा येथे मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्विफ्ट डिझायर (एमएच-०१-बीएफ-९१६५) वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात मध्यप्रदेशात विक्रीस परवानगी असलेले, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा आढळून आला. विदेशी दारुचे ५ बॉक्स मिळून एकूण २० बॉक्स जप्त करण्यात आले. गाडी आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, अशी माहिती शहाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Web Summary : State Excise Department seized foreign liquor worth ₹6.97 lakh and a car in Baramati, preventing illegal transport before elections. Two individuals, Ramsingh Rajput and Mahipalsingh Rajput, were arrested for possessing liquor intended for sale in Madhya Pradesh but prohibited in Maharashtra.
Web Summary : राज्य उत्पाद शुल्क विभाग ने बारामती में 6.97 लाख रुपये की विदेशी शराब और एक कार जब्त की। चुनाव से पहले अवैध परिवहन को रोका गया। मध्य प्रदेश में बिक्री के लिए शराब रखने के आरोप में रामसिंह राजपूत और महिपालसिंह राजपूत गिरफ्तार।