शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 20:56 IST

- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी 

पुणे : साथीदारासह रिक्षात बसून अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाला पकडून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रिक्षासह ७ लाखांचा माल हस्तगत केला आहे. मुजम्मील वाजीद खान (२५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३३ हजार रुपयांचा २६ ग्रॅम एमडी, १५ हजारांचे दोन मोबाईल, दीड लाखांची रिक्षा असा ६ लाख ९८ हजारांचा माल जप्त केला आहे.अमली पदार्थ विरोधी पथक २ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना नशेमन बिल्डिंगसमोरील रोडवर एका रिक्षात मुजम्मील खान हा साथीदारासह बसला होता. ते कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसले. पोलिस आणि आरोपींचे एकमेकांकडे लक्ष जाताच मुजम्मीलचा साथीदार हा वेगाने सिंहगड गॅरेज चौकाकडे पळून गेला. पोलिसांनी मुजम्मील खान याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने साथीदाराने एमडी विक्री करता दिल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय अनिल सुरवसे, पीएसआय दिगंबर कोकाटे, पोलिस कर्मचारी विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, संदिप शिर्के, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, खडक पोलिस ठाण्यातील पीएसआय कांबळे, पोलिस अंमलदार पांडुळे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी