शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोझे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा;प्राध्यापक व ३ विद्यार्थी अटकेत, उत्तरपत्रिका २ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 21:16 IST

मोझे महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला, अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेतले जात होते.

-सुरेश वांढेकरवाघोली - अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेची वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना पेपर लिहू दिल्याप्रकरणी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. उत्तरपत्रिकेची ६ बंडल, २ लाख रुपये आणि कंट्रोल रूमची चावी जप्त करण्यात आली आहे. वाघोलीतील बायफ रोडवरील पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी एक प्राध्यापक, एक विद्यार्थी आणि इतर दोन साथीदार अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रा. प्रतीक किसन सातव (वय ३७), आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १८) आणि अनिकेत शिवाजी रोडे (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स - २ या विषयाच्या उत्तरपत्रिकांची ६ बंडल, २ लाख ६ हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवलेल्या कंट्रोल रूमची चावी जप्त करण्यात आली आहे.

मोझे महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला, अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेतले जात होते. त्यांना रात्री पुन्हा पेपर लिहिण्याची संधी दिली जात होती. यासाठी खास चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयावर छापा टाकला.त्यावेळी प्रा. प्रतीक सातव हे, दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स - २ या विषयाचा पेपर पुन्हा लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पेपर लिहू देत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या टीमने केली.असा चालला होता मोझेमध्ये उद्योगप्रा. प्रतीक सातव हा कॉलेजमधील इतर तीन विद्यार्थ्यांना हाताशी धरून हा उद्योग करत होता. आदित्य खिलारे हा या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांच्याकडून आधी पैसे घेत असे. त्यानंतर, कोणी नसताना पहाटेच्या सुमारास या मुलांना बोलावून त्यांच्याकडून पुन्हा पेपर लिहून घेत असे. अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे हे दोघेही आदित्यप्रमाणे याच कॉलेजचे वरिष्ठ वर्गातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. हे दोघे कंट्रोल रूम बनावट चावीने उघडून, पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर बंडलमधून शोधून देत असत. पेपर लिहून झाल्यावर, ते पुन्हा बंडलमध्ये ठेवण्याचे कामही ते करत होते. ज्यांच्याकडून आदित्यने पैसे घेतले होते, असे आठ विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या विरोधात सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) या कायद्यांतर्गत आणि अन्य विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी