लोणी काळभोर : बनावट गुटखा आणि तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांनी गुरुवारी (दि. ४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कारवाई करून तब्बल १ कोटी रुपयांची सामग्री हस्तगत केली आहे. अधिकच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पथक यांना थेऊर फाटा परिसरातील सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनमध्ये बनावट गुटखा तयार केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तात्काळ धाड टाकून गोडाऊनमध्ये साठवलेला बनावट आरएमडी, विमल गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, केमिकल, थंडक, गुलाबपाणी, बनावट सुपारी, बनावट पुड्या, बॉक्स, पोती आदी साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या कारवाईत गुटखा वाहतूक करण्यासाठी खास मॉडिफाय केलेल्या दोन इनोव्हा कार आणि टाटा नेक्सॉन अशा मिळून ५० लाख रुपये किंमतीच्या तीन गाड्या तसेच १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. काळुबाई मंदिराजवळ, पत्रा वस्ती, थेऊर) यास अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती (वय ५०, रा. थेऊर, पुणे, मूळ उत्तर प्रदेश), अप्पु सोनकर (वय ४६, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा) आणि दानिश खान (वय १८, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.गोडाऊनचा मालक सुमित गुप्ता फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचा सक्रिय सहभाग होता. कारवाईदरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा संपूर्ण कर्मचारी वर्गही उपस्थित होता. या छाप्यातून परिसरातील बनावट गुटखा रॅकेटचे मोठे जाळे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Pune police raided a fake gutkha factory in Loni Kalbhor, seizing goods worth ₹1 crore. The raid led to arrests and exposed a larger network involved in manufacturing and distributing counterfeit tobacco products. Further investigation is underway.
Web Summary : पुणे पुलिस ने लोनी कालभोर में एक नकली गुटखा फैक्ट्री पर छापा मारा, जिसमें ₹1 करोड़ का माल जब्त किया गया। छापे से गिरफ्तारियां हुईं और नकली तंबाकू उत्पादों के निर्माण और वितरण में शामिल एक बड़ा नेटवर्क उजागर हुआ। आगे की जांच जारी है।