शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : गूढ मृत्यू प्रकरणाने पुण्यात खळबळ..! प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:44 IST

तरुणीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पुणे - प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरले आहे. प्रियकराचा मृतदेह तळेगाव रेल्वे ट्रॅकवर तर त्याचवेळी प्रेयसीचा मृतदेह संगमवाडी परिसरातील त्याच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या दुहेरी मृत्यूमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे गणेश काळे (२१, रा. बीड) आणि मृत तरुणीचे नाव दिव्या निगोश (२०, रा. येरवडा)  आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातून पुढील तपास केला जात आहे. गणेश आणि दिव्या दोघेही पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. नोकरीदरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे समजते. गणेश काळे संगमवाडीतील दुर्गामाता मंदिर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी रात्री तळेगाव रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला. त्याच वेळी दिव्या बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती. शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी गणेशच्या खोलीत प्रवेश केला असता दिव्याचाही मृतदेह आत आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले. दिव्याच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रेमसंबंधातील वादातून ही दुर्दैवी घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Lovers' Deaths on Tracks, in Room Spark Mystery

Web Summary : Pune shaken by double death: man found on railway track, woman in apartment. Both were lab technicians. Police suspect murder-suicide due to love affair issues. Investigation ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रBeedबीडPuneपुणे