शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं; तोतया विंगकमांडर निघाला हॉटेलचा वेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:02 IST

- दौंडला बॅग चोरीची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला अटक

दौंड : चेन्नई येथे भारतीय हवाईदलात (एअरफोर्स) विंग कमांडर असल्याचे सांगून दौंड रेल्वे स्थानकातून बॅग चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्यक्षात ही व्यक्ती विंग कमांडर नसून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दौंड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता वासुदेव राज (वय ३२, रा. वरवंड, जि. बुलढाणा) याने २३ जानेवारी २०२३ रोजी दौंड रेल्वे स्थानकातून पहाटेच्या सुमारास आपली बॅग चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्याने तक्रारीत म्हटले होते की, बॅगेत ९ एमएमचे पिस्तूल, पासपोर्ट, हवाईदलाचा गणवेश आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. दत्ता राज याने सांगितले की, तो चेन्नई येथे हवाईदलात विंग कमांडर असून त्याची बदली पुण्यातील सदन कमांड येथे झाली आहे. तो चेन्नईहून पुण्याकडे येत असताना दौंड रेल्वे स्थानकात उतरला आणि प्लॅटफॉर्मवर झोपला होता. पहाटे जाग आल्यानंतर त्याने बॅग चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली.पोलिस तपासातून उघड झाले सत्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, भारतीय हवाईदलाकडून दत्ता वासुदेव राज या नावाची कोणतीही व्यक्ती विंग कमांडर म्हणून कार्यरत नसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिस पथकाने त्याच्या मूळ गावी, वरवंड (जि. बुलढाणा) येथे चौकशी केली. गावात आणि त्याच्या घरीही त्याने सर्वांना सांगितले होते की तो हवाईदलात विंग कमांडर आहे. मात्र, तो गावात आढळून आला नाही.पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता, तो सुरत येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. याशिवाय, त्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही ठिकाणी वेटर आणि रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले होते. दौंड रेल्वे पोलिसांनी सुरत येथून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.स्वप्न अंगलट आलंदत्ता राज याने पोलिसांना सांगितले की, त्याला हवाईदलात किंवा सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याने सर्वत्र स्वतःला विंग कमांडर म्हणून सांगितले आणि ही खोटी कहाणी रचली. “माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं,” असे त्याने पोलिसांना सांगितले. दौंड रेल्वे पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने खोटी तक्रार देण्याचे गंभीर परिणाम आणि बनावट ओळख रचण्याचे धोके अधोरेखित केले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी