शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 21:11 IST

पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले

पुणे : खाणीतील खोदकामाच्या उपकरणांचा १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथरूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार रुपये काढून घेतल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड), असे उद्योजकाचे नाव आहे. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते. पुणेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांना एक ई-मेल आला होता. त्यावरून त्यांनी संबंधितांना फोन केला होता. ‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून, १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे’, अशी बतावणी समोरून करण्यात आली. त्यानंतर संबंधितांनी शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार शिंदे हे ११ मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर शिंदे यांचे संबंधितांसोबत बोलणे झाले, त्यानुसार शिंदे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथील खाण पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्याने शिंदे यांच्या कुटुंबाने १२ एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शिंदे यांचे लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागांत आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचे एक पथक पाटणा येथे रवाना झाले. पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले. त्यानंतर पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी शिंदे यांचा शोध घेतल्यानंतर सोमवारी (१४ एप्रिल) बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह सापडला.

दरम्यान, आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून ९० हजारांची रक्कम काढून घेऊन मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचे उघड झाले. पाटणा पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.

उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडला आहे. आरोपींनी त्याच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. अधिक तपासामध्ये गुजारातच्या व्यापार्यालाही अशाच प्रकार बिहार येथे बोलवून त्याचे अपहरण करून त्याच्याकडील अडीच लाख रूपये मारहाण करून जबदरस्तीने काढून घेतले होते. नंतर त्याला सोडूनही देण्यात आले होेते. असाच प्रकार यागुन्ह्यात झाल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने आरोपींची गुन्ह्या करण्याची पद्धतीही समोर आली आहे. -अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिस