शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला;पार्टीतील वादातून मित्राला दिले वाहत्या पाण्यात ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:44 IST

मारहाण करून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचे आईला सांगितले होते.

पुणे : हडपसर येथील उन्नतीनगर कालव्यात एकाचा मृतदेह आढळला होता. चांगले पोहता येऊनही पतीचा पाण्यात पडून मृत्यू कसा होईल, अशी शंका फिर्यादींनी व्यक्त करून त्याच्या खुनाचा संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदनात मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल आला होता. सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार याबाबत धागेदोरे तपासून एक वर्षाने हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला.

विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, रा. साक्षी लॉन्स, कमळापूर रोड, छत्रपती संभाजीनगर) आणि आशिष यांच्यावर गुन्हा दाखल झाला. स्वारगेट येथील लक्ष्मी कॅनॉलपासून हा कॅनॉल भूमिगत जातो. तो थेट हडपसरला उघडा होतो. त्यामुळे विनोद शार्दुल यांना चांगले पोहता येत असले तरी दोघांनी त्यांना मारहाण करून कालव्यात टाकून दिले. कालवा भूमिगत असल्याने त्यांना बाहेर पडायला संधी मिळाली नाही. त्यातच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील लक्ष्मी कॅनॉलजवळ ४ मे २०२४ रोजी घडली होती.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद होती. मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या अहवालातही पाण्यात बुडून मृत्यूची नोंद होती. नंतर विनोद शार्दुल यांच्याबरोबर केटरिंगच्या कामात कोण कोण होते, याची माहिती घेतली असता, वैभव जाधव आणि आशिष हे बेपत्ता आढळले. वैभव जाधव याच्या आईकडे चौकशी केल्यावर तिने तिघांत भांडण झाल्याचे सांगितले. यावेळी आम्ही दोघांनी विनोद शार्दुलला मारहाण करून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचे आईला सांगितले होते.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी