शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime:‘माता न तू वैरिणी’...! मंचरमध्ये आईकडून मुलीच्या खुनाचा प्रयत्न; मुलासह विहिरीत उडी, सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 18:12 IST

- या प्रकारात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून संबंधित महिला बचावली आहे. मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ‘माता न तू वैरिणी’...!

मंचर (पुणे जि.) : कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आणणारी आणि मानवतेलाही हादरवून सोडणारी घटना मंचरमध्ये घडली आहे. एका आईने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेत विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून संबंधित महिला बचावली आहे. मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे आहे, तर जखमी मुलगी परिज्ञा आशिष बाणखेले (वय १३) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) हिच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. यामुळे दोघे वेगळे राहत होते. पती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता, तर हर्षदा बाणखेले ही लालबाग प्रेस्टिज परिसरात दोन मुलांसह राहत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हर्षदाने घरातच मुलगी परिज्ञाचा वायरच्या साहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने मुलीला मारहाणही केली. गळा आवळल्यामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याने ती मृत झाली, असा समज करून हर्षदाने घराला बाहेरून कुलूप लावले. यानंतर तिने सहा वर्षीय मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीत उडी मारली. या घटनेत निहांतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र, विहिरीत असलेल्या पाईपचा आधार मिळाल्याने हर्षदा बचावली.अशी उघडकीस आली घटनातपनेश्वर स्मशानभूमीत सकाळी एक विधी सुरू असताना, विहिरीजवळ गेलेल्या एका व्यक्तीला महिलेचा आर्त आवाज ऐकू आला. त्याने तत्काळ आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि दोघांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी निहांतला मृत घोषित केले. दरम्यान, घराचे कुलूप उघडल्यावर मुलगी परिज्ञा जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणी महिलेचा पती आशिष लक्ष्मण बाणखेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षदा बाणखेले हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Mother attempts to kill daughter, throws son in well.

Web Summary : In Manchar, Pune, a woman tried to kill her daughter and threw her son into a well, resulting in the son's death. The daughter is injured, and the mother survived. Family disputes are suspected to be the cause.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र