पुणे - शहरातील अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने न-हे गाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकत ४ महिलांची सुटका केली असून ३ पुरुष आरोपींना अटक केली आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, न-हे गाव झिल कॉलेज जवळ “स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खात्री करून पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर अचानक छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक दिलीप गवळी (वय २४, रा. खेड शिवापूर), रामू सांडू देवकर (वय २४, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि महेश गणेश नागने (वय ३४, रा. न-हे गाव, पुणे) या तिघांना अटक केली आहे. या तिघांवर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा न-हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Pune police busted a sex racket at 'Swarg Executive Paradise Lodge' near Zeal College, Nere. Four women were rescued, and three men were arrested for trafficking under the Prevention of Immoral Trafficking Act.
Web Summary : पुणे पुलिस ने न-हे के झील कॉलेज के पास 'स्वर्ग एग्जीक्यूटिव पैराडाइज लॉज' में एक सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया। चार महिलाओं को बचाया गया, और तीन पुरुषों को अनैतिक तस्करी रोकथाम अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया।