राजगुरुनगर : अन्न आणि औषधे विभागाचा निरीक्षक असल्याचे भासवून मेडिकल दुकानाची (औषध विक्री) तपासणी करणारा तसेच त्यातील नसलेले दोष दाखवून वीस हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली. आकाश कोंडुसकर (मूळ नाव आनंद गौतम भुजंग, वय ३४, रा. सांगवी, पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तोतया निरीक्षकाचे नाव आहे.
राजगुरुनगर येथील भवानी मेडिकलमध्ये एक व्यक्ती आली. त्याने आपण अन्न आणि औषध विभागाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचे सांगितले. त्याने विविध चौकश्या सुरू केल्या आणि वीस हजार रुपयांची मागणी केली. असे करताच मेडिकल चालक तरुण चौधरी यांनी त्याचे आय कार्ड पाहण्यासाठी मागितले. हे कार्ड पाहण्यासाठी घेतल्यावर नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा नवीन वाटणारे नाव वाचून घेतले.
बाजूला जाऊन अन्न व औषध प्रशासनाला तातडीने संपर्क साधला. अशा नावाचा कोणीही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या निरीक्षकाला थांबवून ठेवण्याचे सांगण्यात आले. मात्र, संशय आल्याने हा तोतया पोलिस निरीक्षक नाष्टा करून परत येतो म्हणून येथून निसटला. तो गेलेल्या मार्गावर त्याचा मागोवा घेतला. एका सीएनजी पंपावर हा व्यक्ती त्याच्या वॅगनआर वाहनाला गॅस भरून घेत असल्याचे दिसून आले. सगळ्यांनी त्याला घेरले.
प्रश्नांची सरबत्ती केल्यावर उडवाउडवीची उत्तर देऊन तो जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन तोतयागिरी आणि त्याद्वारे फसवणूक करण्यावरून आकाश कोंडुसकर (मूळ नाव आनंद भुजंग, वय ३४, रा. सांगवी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Summary : A man posing as a food and drug inspector was arrested in Rajgurunagar for demanding ₹20,000 from a medical store owner. Suspicions arose when the owner checked his ID and contacted authorities, who confirmed he wasn't an employee. He was caught at a CNG pump.
Web Summary : राजगुरुनगर में एक खाद्य एवं औषधि निरीक्षक बनकर एक मेडिकल स्टोर के मालिक से ₹20,000 मांगने वाले एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया। मालिक को संदेह हुआ, उसने आईडी जाँची और अधिकारियों से संपर्क किया, जिन्होंने पुष्टि की कि वह कर्मचारी नहीं था। वह सीएनजी पंप पर पकड़ा गया।