शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा..! पुण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण दोन कोटींसाठी नव्हे तर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:51 IST

दोन कोटींसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण ? पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

किरण शिंदेपुणे - दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना बिबवेवाडी परिसरात घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, हे अपहरण खरे नसून व्यापाऱ्याने स्वतःचाच अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.  नेमक काय घडले ?  पुण्यातील हिरे व्यापारी तिथल शहा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या पत्नी आणि मुलासोबत होते. त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामासाठी कॅम्पला जात असल्याचे सांगून निघून गेले. काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. या कॉलवर "मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो," अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेतली.  पोलिसांचा वेगवान तपास आणि धक्कादायक सत्य आले समोर  घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. व्यापाऱ्याचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळले, तिथेच त्यांची दुचाकीही सापडली. मात्र, सखोल चौकशीत तिथल शहा यांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले.

अपहरण प्रकरणातील तितल शहाकडे केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान ते म्हणाले, 'मला पुण्यातील दहा ते बारा लोकांनी व्याजाने पैसे दिले होते. ते व्याजाचे पैसे देणे न झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या फॅमिलीला किडनॅपिंगचा  खोटा कॉल करून, नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून घेतला, त्यानंतर रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई येथे गेले, तिथून पुढे बॉम्बे सेंट्रल इथे एक दिवस लॉजवर राहलो. तर खार वेस्ट मुंबई येथे लॉजवर दोन दिवस आणि  एक दिवस विलेपार्ले येथे राहिलो, सदर लोकांनी दिलेल्या त्रासामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचेही शहाने सांगितले. तरी, या प्रकरणी अधिक तपास करत आहोत .  

आर्थिक अडचणीतून बनाव?व्यापारी तिथल शहा काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. कर्जाचा भार वाढल्याने त्यांनी बनावट अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, तिथल शहा सुखरूप घरी परतले असून, पोलीस त्यांच्याकडून अधिक चौकशी करत आहेत. हा प्रकरण आणखी मोठे गुंतागुंतीचे आहे का, याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी