पुणे : बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित चांदेर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या राहत्या जागेवरून चुलतभावांशी मालमत्तेचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस दिली होती. त्यानंतरही तेथे बांधकाम सुरूच असल्याने तक्रारदार या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात गेले होते.
दरम्यान, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे आले. त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, ‘माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला ‘बांबू काढ’ असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.
Web Summary : In Pune, corporator Baburao Chandere threatened a citizen outside a police station over a construction dispute. The corporator allegedly threatened to demolish the victim's house for objecting to construction work halted by a municipal notice. A non-cognizable offense has been registered, and police are investigating.
Web Summary : पुणे में, नगरसेवक बाबूराव चांदेरे ने निर्माण विवाद को लेकर पुलिस स्टेशन के बाहर एक नागरिक को धमकी दी। चांदेरे पर आरोप है कि उन्होंने नगरपालिका नोटिस से रोके गए निर्माण कार्य पर आपत्ति जताने पर पीड़ित का घर गिराने की धमकी दी। असंज्ञेय अपराध दर्ज, जांच जारी।