पुणे - पुण्यातील विमाननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका नामांकित सोसायटीत राहणाऱ्या रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा दूधवाला असून मागील दोन वर्षांपासून तो या सोसायटीत नियमितपणे दूध टाकण्याचे काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणताही संशय घेतला जात नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी दूध टाकण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घराजवळ यायचा. घराच्या दरवाजाला असलेल्या डिजिटल लॉकचा गैरफायदा घेत तो वेगवेगळे पासवर्ड टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. या डिजिटल लॉकमध्ये एका वेळेला फक्त तीन वेळा पासवर्ड टाकण्याची मुभा असते. चौथ्या प्रयत्नानंतर पासवर्ड चुकला असता की-पॅड काही काळासाठी लॉक होतो.
गेल्या तीन महिन्यांपासून आरोपीने अनेकदा अशा प्रकारे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रत्येकवेळी अपयश येत होते. अखेर १७ जानेवारी रोजी आरोपीने टाकलेला पासवर्ड खरा ठरला आणि घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने घरात प्रवेश करून चोरी केली. त्याने घरातून एकूण १ लाख ३२ हजार रुपये लंपास केले होते.
दरम्यान चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी व्यंकटेश वसंत करंडे याला अटक केलं त्याने चोरलेले १ लाख ३२ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
Web Summary : A milkman, delivering milk for two years, stole ₹1.32 lakh from the Rameshwaram Cafe owner's Pune home by exploiting the digital lock. Police arrested the suspect and recovered the stolen money.
Web Summary : पुणे में रामेश्वरम कैफे के मालिक के घर से एक दूधवाले ने डिजिटल लॉक का फायदा उठाकर ₹1.32 लाख चुरा लिए। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर चोरी का पैसा बरामद किया।