नीरा (ता. पुरंदर) – नीरा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम किसनराव आगवणे (वय ६९) हे नीरा येथे पेट्रोल पंप व चप्पल दुकानाचा व्यवसाय करतात. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला.घरातील पेट्रोल पंपावरील डिझेल-पेट्रोल विक्रीची ५ लाख ३७ हजार ७६० रुपये, कार्यालय व चप्पल दुकानातील १ लाख ५० हजार रुपये, तसेच सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, चैन, अंगठ्या व कानातील टॉप्स असा एकूण १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सर्जेराव पुजारी करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे नीरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घरांची सुरक्षा वाढवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Web Summary : Thieves burgled a Neera home, stealing ₹12.62 lakh in cash and jewelry. Police are investigating, reviewing CCTV footage to identify the suspects. The incident has sparked fear among locals.
Web Summary : नीरा में चोरों ने एक घर में सेंध लगाकर ₹12.62 लाख नकद और गहने चुरा लिए। पुलिस जांच कर रही है, संदिग्धों की पहचान के लिए सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है। इस घटना से स्थानीय लोगों में दहशत है।