शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅलो हॉटेलमध्ये बॉम्ब आहे;' तो' फोन कॉल अन् पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:12 IST

“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” असा इशारा देण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली.

पुणे - शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या लँडलाईनवर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा कॉल आल्याने शुक्रवारी दुपारी मोठी धावपळ उडाली. तात्काळ हॉटेल रिकामे करण्यास सांगत अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासणीत हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकच्या माहितीनुसार, शुक्रवारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून हॉटेलच्या अधिकृत लँडलाईनवर कॉल आला. “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” असा इशारा देण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर कोणताही संशयास्पद वस्तू किंवा धोका आढळला नाही.

या प्रकरणी हॉटेलचे सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी कॉल केलेल्या मोबाईल क्रमांकाची (९८३२२५****) नोंद घेण्यात आली असून आरोपीचा माग काढण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी हा प्रकार खोडसाळ असल्याचे म्हटले असून अशा प्रकारच्या फेक कॉल्सना गांभीर्याने पाहत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bomb Threat Call Sparks Panic at Pune Five-Star Hotel

Web Summary : A bomb threat on a hotel landline in Pune caused panic. Police and bomb squads searched the premises, finding no bomb. The call was deemed a hoax, and police are investigating the anonymous threat.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र