शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

हॅलो इन्स्पेक्टर : भांडणातील शब्द कानावर पडताच महिला म्हणाली,हेच ते दरोडेखोर

By नितीश गोवंडे | Updated: May 29, 2025 14:56 IST

- चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी उकलले मेंढपाळ वस्त्यांवरील दरोड्यांचे गूढ

पुणे : जळगाव जिल्ह्यात वर्ष २००९ मध्ये मेंढपाळ वस्त्यांवर वारंवार दरोडा पडण्याच्या घटना घडत होत्या. या गुन्ह्यांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये होत होती; मात्र आरोपी पकडले जात नव्हते. धनगर समाज यामुळे अस्वस्थ झाला होता. मुंबईत प्रशासनाविरोधात मोर्चा नेण्याची तयारी झाली होती. अखेर जळगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या स्पेशल स्क्वॉडला आरोपी पकडण्याचे आदेश दिले. चार महिने सखोल तपास करून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्यासह त्यांच्या टीमने दरोड्यावेळी आरोपी बोलत असलेली भाषा यांसह त्यांच्यातील भांडणादरम्यान वापरण्यात येणारे शब्द, लहेजा यावरून संशयित असलेले आणि स्वत:ला व्यावसायिक म्हणवणारे राजस्थानी लोकच दरोडेखोर असल्याचे निष्पन्न केले. याच गुन्हेगारांनी वर्ष २००७ मध्ये केलेला एक गुन्हा देखील उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले.

गुंतागुंतीचे गुन्हे सोडवण्याचा हातखंडा अशी ओळख असलेले विश्वजीत काइंगडे हे सध्या शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वर्ष २००९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील हडसन, वढोदा, कळमसरे, साळवा आणि भडगाव शिवार येथील शेतांवर उतरलेल्या मेंढपाळांच्या वस्त्यांवर दरोडे टाकून त्यांना लुटले जात होते. छत्रपती संभाजीनगर, धुळे, बुलडाणा येथे देखील दरोडेखोरांनी धुडगूस घातला होता. संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी पकडण्यात यश मिळाले नाही. अखेर तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी त्यांच्या स्पेशल स्क्वॉडला हे दरोडेखोर शोधण्याच्या सूचना दिल्या. काइंगडे यांनी सर्वप्रथम दाखल गुन्ह्यांमध्ये असलेला कॉमन धागे शोधले. यामध्ये सोन्याचे दागिने लुटले, हिंदी पण पावरा लोकांची भाषा हे मुद्दे कॉमन असल्याचे आढळले.दरोडेखोर मारहाण करून लुटायचे सोन्याचे दागिने...

मेंढपाळांची वस्ती शक्यतो गावाबाहेर शेतांमध्ये असते. अनेक दिवस घराबाहेर राहावे लागत असल्याने मेंढपाळांकडे पैसा अधिक असतो; पण रोख रक्कम बाळगण्याऐवजी ते सोन्याचे दागिने करून घेत. दरोडेखोरांना या महिलांच्या अंगावर दागिने दिसले की, ते हेरून रात्री मेंढपाळ वस्तीवर दरोडा टाकायचे. आधी ते मारहाण करून दागिने मागायचे, कुणी विरोध केला तर जबरी मारहाण करून दागिने घेऊन पळून जायचे. पहिला गुन्हा जळगाव जिल्ह्यात याप्रकरणी डिसेंबर २००८ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर २-३ आठवड्यांत, महिनाभरात असे प्रकार वारंवार होत होते. ८ ते १० जणांची दरोडेखोरांची टोळी वस्त्यांवर येऊन दरोडा टाकून जात असे.

दुसरे गुन्हे उघडकीस; पण दरोड्याचे गुन्हे ‘जैसे थे’..काइंगडे आणि त्यांच्या पथकाने दाखल गुन्ह्यांतील कॉमन धाग्यांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. १६ ते १७ पावरा लोकांनी केलेले अन्य गुन्हे यादरम्यान उघडकीस आले. मात्र, त्यांच्या हाती दरोड्याच्या प्रकरणांतील आरोपी लागले नाहीत. अनेक दिवस चाचपडल्यानंतर त्यांनी फिर्यादींना पुन्हा भेटण्याचे ठरवले. त्यानंतर तपास पथकाला आपण चुकीच्या दिशेने तपास करत होतो, पावरा लोकांनी हे गुन्हे केलेलेच नसल्याचे समजले. आठवडी बाजार ठरला महत्त्वाचा दुवा..

दरम्यान, फिर्यादींना भेटल्यानंतर दरोडा पडला त्या दिवशी त्यांची दिनचर्या पोलिसांनी विचारली. यामध्ये आठवडी बाजार हा एक मुद्दा पुन्हा एकदा सगळ्या फिर्यादींच्या सांगण्यातून समोर आला. ज्या-ज्या दिवशी मेंढपाळ वस्त्यांवर दरोडा पडला त्या-त्या दिवशी संबंधित मेंढपाळ आठवडी बाजाराला गेले होते, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.

ना प्रत्यक्षदर्शी, ना तांत्रिक पुरावा..या प्रकरणात कोणताही तांत्रिक पुरावा पोलिसांकडे नव्हता. याशिवाय दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकत असल्याने त्यांना ओळखणारे प्रत्यक्षर्शी कोणी नव्हते. त्यामुळे आरोपींचे फोटो अथवा अन्य कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. फिर्यादींकडे केवळ त्यांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत, याच दोन बाबी आरोपींची ओळख दर्शवणाऱ्या होत्या.संशयित ताब्यात..पोलिसांनी यानंतर गावातील आठवडी बाजारांवर लक्ष केंद्रित केले. या बाजारात काही राजस्थानी लोक बैल विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांची भाषा ही फिर्यादी सांगत असलेल्या भाषेसोबत मिळतीजुळती होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या लोकांना एक बैल विकल्यानंतर किमान ५ हजार रुपये मिळायचे, त्यामुळे हे लोक दरोडेखोर असतीलच असे नाही असेही पोलिसांना वाटत होते. पोलिसांनी त्यांचे बोलणे मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून मेंढपाळांना ऐकवले. बैल विक्रेत्यांची भाषा आणि दरोडेखोरांची भाषा एकच असल्याचे पोलिसांना त्यांनी सांगितले. मात्र, बैल विक्रेते स्वत:ला व्यावसायिकच असल्याचे सांगत होते. 

भांडायला लावले अन् एक तक्रारदार महिला समोर आली...पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजस्थानी लोकांना अंधारात एकमेकांशी भांडायला लावले. त्यावेळी ीएक धनगर महिला पुढे आली व तिने हेच ते दरोडेखोर असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच स्वत:ला बैल विक्रेते म्हणवणाऱ्यांनी दरोडे टाकल्याची कबुली दिली. यावेळी वर्ष २००७ मध्ये कुंड या गावातील एका घरात याच आरोपींनी दरोडा टाकून घरातील नागरिकांना जबरी मारहाण करत लुटल्याचे देखील पोलिसांना सांगत, तो गुन्हाही कबूल केला. दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे या स्पेशल स्क्वॉडला अधीक्षकांनी १० हजार रोख बक्षीसही दिले.

अनेकदा अपयश आले तरी, तपास करत राहायचा. काही ना काही त्यातून समोर येतेच. मिळणाऱ्या प्रत्येक माहितीचे योग्य विश्लेषण केले तर नक्कीच गुन्हा उघडकीस येऊ शकतो. खचून न जाता दररोज नव्या जोमाने काम केल्यास, कामात सातत्यता ठेवल्यास कोणताही आरोपी जास्त काळ पळू शकत नाही.  - विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे-माळवाडी, पोलिस ठाणे  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या