कुरकुंभ : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि. २६) मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे महामार्ग परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अक्कलकोट, तुळजापूर आणि येडेश्वरी देवीच्या दर्शनाहून परतत असताना चालकाला झोप आल्याने कार क्रमांक (एमएच १४ एमटी ४६०९) कुरकुंभ येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील पुलाच्या पुढे रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली होती. कार थांबलेली असतानाच दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित प्रवाशांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलिस पथके तैनात करण्यात आली असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील रात्रीच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाटस टोलनाक्यावरील गस्त वाहनांची प्रभावी उपस्थिती आहे की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणांचा अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे.
महामार्गावर वाढत असलेल्या जबरी चोरी व लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा गुन्हेगार टोळ्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने महामार्गावरील गस्त वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Near Kurkumbh, armed robbers targeted women returning from pilgrimage, stealing jewelry. Police are investigating CCTV footage and have deployed special teams. Concerns rise over highway patrol effectiveness and CCTV absence at establishments.
Web Summary : कुकुंभ के पास, तीर्थयात्रा से लौट रही महिलाओं को बंदूकधारियों ने निशाना बनाया और गहने चुरा लिए। पुलिस सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है और विशेष टीमों को तैनात किया है। राजमार्ग गश्त की प्रभावशीलता और प्रतिष्ठानों पर सीसीटीवी की अनुपस्थिति पर चिंता बढ़ रही है।