शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे क्राईम : नववीतील विद्यार्थ्याने रागाच्या भरात वर्गातच काचेच्या तुकड्याने मित्राचा गळा चिरला

By नम्रता फडणीस | Updated: November 21, 2024 16:16 IST

या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पुणे : मांजरीमधील एका खासगी शाळेच्या वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. शाब्दिक वादाचा राग मनातून धरुन नववीतील विद्यार्थ्याने वर्गातच काचेने मित्राचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणात एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत जखमी मुलाने विधिसंघर्षित मुलाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा एका खासगी शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. विधिसंघर्षित मुलगा देखील त्याच वर्गात शिकत आहे. दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला होता.

दि. १९ नोव्हेंबर रोजी अडीच वाजता तक्रारदार मुलगा हां वर्गात बसला होता. त्यावेळी विधिसंघर्षित मुलगा त्याच्या पाठीमागून आला आणि त्याने धारदार काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. मुलाच्या या कृत्याने मुलां मध्ये धावपळ उडाली. या घटनेनंतर विधिसंघर्षित मुलाने जखमी मुलाला धमकावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिक्षक व कर्मचा-यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधिसंघर्षित मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकड़े करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी