शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:10 IST

पैशासाठी तगादा लावून,मारहाण करुन एकास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन आवारेवस्ती (बावडा) येथील अनोळखी इसमांसह सहा जणांविरुद्ध गुरुवारी ( दि.२६) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इंदापूर : पैशासाठी तगादा लावून,मारहाण करुन एकास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन आवारेवस्ती (बावडा) येथील अनोळखी इसमांसह सहा जणांविरुद्ध गुरुवारी ( दि.२६) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अक्षय पोपट शिंदे,विजय सतीश आवारे (दोघे रा. आवारेवस्ती बावडा) व चार अनोळखी इसमांचा आरोपींमध्ये समावेश आहे.सागर माणिक जाधव (वय ३१ वर्षे, रा.आवारेवस्ती बावडा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे बंधू सचिन माणिक जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, सागर जाधव हा इंदापूरात ज्ञानदिप पॅरामेडीकल ही संस्था चालवत होता. मागील सहा महिन्यापुर्वी त्याने आरोपी अक्षय शिंदे याला संस्थेचे फर्निचर बनवण्याचे काम दिले होते. त्या कामाचे बील १ लाख १५ हजार रुपये झाले होते. त्यातील ५० हजार रुपये सागरने शिंदे यास दिले होते. उर्वरित ६५ हजार रुपये द्यावेत यासाठी शिंदे याने सागरकडे तगादा लावला होता. दि.२३ जून रोजी रोख पैसे देतो असे त्याला सागरने सांगितले होते.त्याच दिवशी शिंदे हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात असणाऱ्या सागरकडे आला.त्याच्या गाडीची चावी काढुन घेतली. तो सोबत काही युवकांना घेऊन आला होता.सागरने फिर्यादी सचिन यास हा प्रकार सांगितला.शिंदे याने मला मारण्यासाठी मुले आणली आहेत. तू लवकर ये असा निरोप दिला.

बारा वाजता सचिन सागरकडे आला. तेथे असलेल्या शिंदेला पैशाची जुळवाजुळव झाली की पैसे देतो असे सांगून तो सागरला घेवून घराकडे निघाला. त्या दोघांना इंदापूर अकलूज रस्त्यावरील कांदा मार्केटजवळ दुचाकी आडवी लावून शिंदे व त्याच्या बरोबर आलेल्या सतीश आवारे याने अडवले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्याच वेळी बावडा बाजुकडून आलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून दोन अनोळखी इसम तेथे आले. शिंदे व आवारे यांनी जाधव बंधूंना मारहाण केली.सचिन व सागर घरी आल्यावर अक्षय शिंदे व तीन अनोळखी इसम तीच स्विफ्ट गाडी घेऊन सचिनच्या घरी आले.तू इंदापूरला चल तुला मारायचे आहे असे म्हणत त्या अनोळखी इसमांपैकी एकाने सचिन व त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यानंतर ते सर्व जण तेथून निघून गेले.सायंकाळी सव्वाचार वाजता इंदापूर पोलीस ठाण्यात जावून जाधव बंधूंनी घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली.मात्र या प्रकरणामुळे सागर अस्वस्थ झाला होता. घरामध्ये कोणाशी काही बोलत नव्हता.मंगळवारी (दि. २५) रात्री सव्वानऊ वाजता सर्वांनी एकत्रित जेवण केले. गुरुवारी सकाळी सहा वाजता सागरने घराच्या स्वयंपाक घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी