शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडमध्ये कार चालकाने उडवल्या पाच दुचाकी;चालकाविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:05 IST

कोथरूड येथील निंबाळकर चौक, युफोरिया बाय, खेळीया सिटी प्राईड या परिसरात घडली.

कोथरूड : कोथरुड परिसरात एका थार वाहनचालकाने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी थार चालकाला रविवारी ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कोथरूड येथील निंबाळकर चौक, युफोरिया बाय, खेळीया सिटी प्राईड या परिसरात घडली.

हृषीकेश सुंदर पुजारी (वय 33) असे ताब्यात केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री हृषीकेश पुजारी हा थार गाडीतून (एम एच 12 यू.एन.1306) हा कोथरुड परिसरातून सिटी प्राईडकडे निघाला होता. सिटी प्राईड परिसरात आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सुमारे पाच-सहा दुचाकीला धडक देत गाडी पुढे गेली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला, परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. काही नागरिकांनी त्याच्या गाडीचा नंबर पाहिला असल्याने गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचे घर गाठले व घरून हृषीकेश सुंदर पुजारी याला ताब्यात घेतले. त्याने मद्दप्राशन करून गाडी चालविली होती का? याचा तपास करण्यासाठी त्याची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप चाचणीचा अहवाल आला नसून चाचणी अहवाल आल्यानंतर नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

काळ्या रंगाच्या काचाथारच्या सर्व बाजूच्या काचांना अगदी डार्क फिल्म लावण्यात आली असल्याने गाडीच्या काचा पूर्ण काळ्या आहेत, गााडीच्या आतील बाजूचे काहीच दिसत नाही. कायद्यानुसार फिल्म लावण्यास बंदी असतानाही अशी फिल्म लावल्या जात आहे. विशेषत: कर्वे रोड, लॉ कॉलेज रस्ता या भागात ड्रायव्हर समोरील काचेवरही काळ्या रंगाच्या फिल्म लावलेल्या अनेक गाड्या वारंवार आढळतात. त्यामुळे काचेचा पारदर्शीपणा कमी होऊन अपघाताची शक्यता अधिक बळावते मात्र वाहतूक पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस