धनकवडी : प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कात्रज येथील आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय ३४, रा. ख्वाजानगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५) याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५ ) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावेद पठाण हा फिर्यादी रौफ शेख याचा भाऊ होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पुण्यात एका ठिकाणी काम करत होता. त्यावेळी आरोपी संदीप भुरके याच्या नात्यातील एका तरुणीशी त्याची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र, या प्रेमप्रकरणास आरोपी संदीप याचा विरोध होता. सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास जावेद आंबेगाव परिसरातील गायमुख परिसरात थांबला असताना आरोपी संदीप आणि त्याच्या साथीदाराने त्याला गाठले. तरुणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी संदीप आणि त्याच्या मित्राने जावेदवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी संदीप भुरके आणि त्याचा साथीदार फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले करत आहेत.
Web Summary : A youth, Javed Pathan, was murdered in Ambegaon due to a love affair dispute. Accused Sandeep Bhurke and an accomplice attacked him with sharp weapons. Javed succumbed to his injuries in the hospital. Police are searching for the absconding accused. Investigation underway.
Web Summary : पुणे के आंबेगांव में प्रेम प्रसंग के विवाद में जावेद पठान नामक युवक की निर्मम हत्या कर दी गई। संदीप भुरके और उसके साथी ने धारदार हथियारों से हमला किया। अस्पताल में जावेद ने दम तोड़ दिया। पुलिस फरार आरोपियों की तलाश कर रही है। जांच जारी।