शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:28 IST

या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे.

पुणे -  शासकीय ठेकेदाराकडून दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे पैसे मागितल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यासह दौंड शिरूर उपविभागाचे उपअभियंता तसेच दौंडचे कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत विभागाने गजाआड केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), उपविभाग दौंड शिरूरचे उप अभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५), दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत.जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाने दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे. हे काम केल्यानंतर दि. ३ मार्च २०२५ रोजी यातील दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदे कडील एस क्यू एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल.त्यासाठी त्या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७,००० रुपये असे १४,००० रुपयाची लाच मागणी केली. तसेच कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजूरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी रक्कमेच्या २ टक्के  प्रमाणे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर उप अभियंता  दत्तात्रेय पठारे यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल तपासुन ती फाईल वरिष्ठ अधिकारी  यांचेकडे पाठवण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता  बाबुराव पवार यांना भेटले असता, त्यांनीसुद्धा दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर  करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपये लाच मागणी केली अशी तक्रार तक्रारदार यांनी १० मार्चला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली.या तक्रारीच्या अनुषंगाने  ११ मार्चला त्या तिघांची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता,  अंजली बगाडे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करुन अहवाल देणा-या एस क्यूं एम टीमसाठी तक्रारदाराध्या प्रत्येक कामाचे ७,००० प्रमाणे दोन कामाचे १४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न  झाले. तसेच दत्तात्रेय पठारे यांनी दोन कामाच्या  बिलाची फाईल तपासणी करुन वरिष्ठांकडे  मंजुरीसाठी पाठवण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांनी दोन कामाच्या बिलाची फाईल मंजुर करुन बिल काढण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपये लाचेची  मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार  १३ मार्चला  केलेल्या सापळा कारवाई दरम्यान बाबुराव पवार यांनी ६४,००० रुपये पंचासमक्ष स्किारले तसेच दत्तात्रेय पठारे यांनी ६४,००० रुपये व अंजली बगाडे यांनी मागणी केलेले १४,००० रुपये असे ७८,००० रुपये पंचासमक्ष स्विकारले असता त्याना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. अंजली बगाडे यांनी १४,००० रुपये लाच मागणी करून, ती रक्कम दत्तात्रय पठारे यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.पवारांच्या कार्यालयात मिळाले साडेआठ लाखकार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ठेकेदारांची गर्दी असते.वारंवार यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी गेल्या होत्या मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयात असणारे एका बॅगेमध्ये  ८,५८,४०० /- रुपये अशी रोख रक्कम मिळून आली असून, ती रक्कम तपासकामी ताब्यात घेण्यात आली असून, त्याबाबत चौकशी सुरु आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसPune Crimeपुणे क्राईम बातम्या