पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे सारथ्य महिलाच करणार आहेत. या ठिकाणी दस्त नोंदणीची सर्व कार्यवाही महिलाच करणार आहेत. शहरातील २७ पैकी ११ दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली. महिलांना मालमत्ता हक्क व कायदेशीर सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
सशक्त महिला, सक्षम समाज महिलांचा सन्मान, प्रगतीची नवी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार, तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून महिलांनी महिलांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत सहजिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या ११ सहदुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १, २, ५, ७, १०, ११, १४, १५, १९, २६, व २७ ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी या सर्व कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम पाहणार आहेत. दरम्यान, या कार्यालयांशिवाय सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १७, २१, २२, २३ व २५ ही कार्यालये या दिवशी नियमित दस्तांच्या नोंदणीसाठी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. या कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी म्हणून काम करतील.
महिला दिनानिमित्त या कार्यालयांमध्ये केवळ नोंदणीसाठी महिला खरेदीदाराच्या लाभातील खरेदीखत/करारनामे दस्तांची नोंदणी (शासन अधिसूचनेनुसार मुद्रांक शुल्कामध्ये १ टक्का सवलत देय असलेले दस्तऐवज), महिला पक्षकारांच्या मृत्युपत्राचा दस्त, महिला पक्षकारांच्या लाभातील कुलमुखत्यारपत्रांचे दस्त, ज्या दस्तांमध्ये पक्षकार महिला नसतील; परंतु ओळख देणारी महिला वकील असेल असे सर्वसाधारण दस्तऐवज स्वीकारले जातील. सर्व महिला पक्षकार व महिला वकिलांनी या विशेष उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगाणे यांनी केले आहे.
Web Summary : Pune celebrates International Women's Day with 11 sub-registrar offices managed entirely by women. This initiative promotes property rights and legal empowerment for women, offering services exclusively to female clients and lawyers on March 8th.
Web Summary : पुणे अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर 11 उप-पंजीयक कार्यालयों का प्रबंधन पूरी तरह से महिलाओं द्वारा किया जाएगा। यह पहल महिलाओं के संपत्ति अधिकारों और कानूनी सशक्तिकरण को बढ़ावा देती है, और 8 मार्च को विशेष रूप से महिला ग्राहकों और वकीलों को सेवाएं प्रदान करती है।