पुणे - पुणे शहरातील पर्वती परिसरात एका व्यक्तीने “पाकिस्तान जिंदाबाद” अशी घोषणा दिल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत चौकशी सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर तथ्य स्पष्ट झाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या या घटनेची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
Web Summary : A complaint alleges pro-Pakistan slogans in Pune's Parvati area. Locals demand strict action, citing threats to national integrity and social harmony. Police investigation underway.
Web Summary : पुणे के पार्वती इलाके में पाकिस्तान समर्थक नारे लगने का आरोप। स्थानीय लोगों ने राष्ट्रीय अखंडता और सामाजिक सद्भाव को खतरे का हवाला देते हुए सख्त कार्रवाई की मांग की। पुलिस जांच जारी।