शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पित्यासह शिक्षिकेच्या पतीकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 09:01 IST

एकटीनेच गाठले पोलिस ठाणे, तुकडे करण्याची दिली धमकी; पाच जण अटकेत

पिंपरी (पुणे) : सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून एका नराधमाने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने, तसेच जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम पित्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. 

याप्रकरणी पीडित मुलीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. समाधान लवटे (४०), प्रताप धायतडे, नितीन हराळे (३२), सागर हराळे (२०) आणि पीडित मुलीचा पित्याविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६ (सी), ३५४, ३५४ (ए), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. हे आराेपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. 

नेमके काय घडले? 

पीडित अल्पवयीन मुलगी ही यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहत होती. त्यावेळी तेथे आलेला समाधान लवटे म्हणाला, मी पण या व्हिडीओप्रमाणे तुझ्यासोबत करतो. त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले. याबाबत कोणाला काही सांगू नको, आपली इज्जत खराब होईल, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी घरात झोपलेली असताना तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता कोणास काही सांगितले तर तुझे तुकडे करेन, असे धमकावले. मुलगी ट्यूशनसाठी शिक्षिकेच्या घरी गेली. त्यावेळी घरात कोणी नसताना शिक्षिकेच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर १९ मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने गैरकृत्य केले. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे बोलून जबरदस्ती केली. त्यानंतर २ जून रोजी पीडित मुलगी आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, मैत्रिणीच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर २९ जून रोजी रात्री वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस