पुणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा करून फरार झालेल्या दोन कुख्यात आरोपींना पुण्यात गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. शिवाजीनगर एस.टी. स्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. साई संजय मदने (वय २३, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि वैभव सुभाष चौधरी (वय २६, रा. दौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यानंतर आरोपींनी पुण्यात येऊन आपले अस्तित्व लपवले होते. शिवाजीनगर एस.टी. स्थानक परिसरात आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींचा पाठलाग करत शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.
आरोपींविरोधात अहिल्यानगरमधील श्रीगोंदा पोलिस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केल्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, अंमलदार संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख आणि ओंकार कुंभार यांच्यासह पथकाने केली.
Web Summary : Two notorious suspects, wanted for kidnapping and attempted murder in Shrigonda, Ahilyanagar, were arrested in Pune. Pune Police Crime Branch Unit Two apprehended them near Shivaji Nagar bus station. The accused have over 20 serious offenses registered against them.
Web Summary : अहिल्यानगर के श्रीगोंदा में अपहरण और हत्या के प्रयास के मामले में वांछित दो कुख्यात आरोपियों को पुणे में गिरफ्तार किया गया। पुणे पुलिस अपराध शाखा यूनिट दो ने शिवाजी नगर बस स्टेशन के पास से उन्हें पकड़ा। आरोपियों पर 20 से अधिक गंभीर अपराध दर्ज हैं।