शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:33 IST

विद्यार्थी सध्या केएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कॉलेजच्या परिसरात घडली.

 पुणे - पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात निकाल पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.तब्बल १ ०  ते १ ५  जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून सात-आठ वेळा वार करण्यात आले. त्यामुळे त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, सदर विद्यार्थी सध्या केएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कॉलेजच्या परिसरात घडली. याबाबत इरफान मोहम्मद हुसेन करणूल यांनी पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा कॉलेजच्या यादीत मित्राचे नाव आहे का, हे पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने धक्का दिल्याने वाद झाला. वाद संपल्यानंतरदेखील दोघांमध्ये  शाब्दिक वाद सुरुच राहिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने 10 ते 15 साथीदारांना बोलावून अचानक हल्ला केला. मारहाणीत रस्त्यावर पडलेला वासा उचलून विद्यार्थ्याच्या डोक्यावर सात-आठ वार करण्यात आले.यादरम्यान, घटनेवेळी जवळच असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रसंगावधान राखत वासा हिसकावून घेतल्यामुळे विद्यार्थ्याचा जीव वाचला. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपल्या मामाला फोन करून प्रकार सांगितला. मामाने धाव घेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. लष्कर पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी