पुणे - पुण्यातील वारजे परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दाजीने गुंगीचं औषध देऊन मेहुणीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे
अधिकच्या माहितीनुसार, दाजीने नवरात्र उत्सवाची संधी साधून मेहुणीला गुंगीचं औषध दिले. यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. बेशुद्ध अवस्थेत तिचे फोटो काढले. हि घटना सहा महिन्यापूर्वी घडली असून याबाबत नुकतीच महिलेने कुटूंबियांना सांगितले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडीस आला. दरम्यान, पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात आरोपी दाजीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या तक्ररीनुसार १८ वर्षीय पीडित मुलीने तिच्या ३६ वर्षीय दाजीविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुटुंबातील सदस्य नवरात्र निमित्त यात्रेला गेले होते. पीडित मुलीच्या डोकेदुखीच्या तक्रारीवरून तिच्या दाजीने तिला दोन गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढले. आणि तिला धमकी दिली की, जर तू हे कोणाला सांगितलंस तर फोटो व्हायरल करीन. या घटनेनंतर आरोपीने कोणत्यातरी कारणावरून भांडण काढले आणि पीडित मुलीच्या सासऱ्याला फोटो दाखवून तिच्या पतीसमोर तिची बदनामी केली. मात्र या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकारचा तपास सुरु आहे.