पुणे - माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठर येथे रेकी करणाऱ्याला पकडून भारती विद्यापीठ पोलिस व गेन्हे शाखेने खूनाचा कट उधळला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी हे रविवारी हद्दीत कायदा व सुव्यवस्थता राखण्यासाठी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी आंबेगाव पठार येथील सुर्या चौकात दत्ता बाळू काळे (रा. डोके तालीमच्या मागे, गणेश पेठ) हा संशयीतरित्या वावरताना आढळला.
भारती विद्यापीठ पोलिस व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने कट रचुन आंबेगाव पठार भागात रेकी करण्यासाठी काळेला पाठवले आहे. त्याला रुम भाड्याने घेवून आंबेगाव पठार येथे ठेवल्याचेही सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा १ सप्टेबर २०२४ रोजी आंबेगाव पठार परिसरातील गुन्हेगारांनी खून केला. या खूनाचा बदला घेण्यासाठी आंदोकर टोळीने कट रचला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, कुमार घाडगे, अंजुमन बागवान, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्यासह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार, तसेच गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली.
पिस्तुल पुरवणाराही जाळ्यात
वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आंदोकर टोळीकडून प्रतिस्पर्धी टोळीशी संबंधित व्यक्तीवर हल्ल्याची तयारी केली जात आहे. या हल्ल्यासाठी पिस्तूल पुरवण्याची जबाबदारी असलेल्या एका गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून त्याच्याकडून एक देशी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचा गुन्हेगारी इतिहास पाहता तो वानवडी व कोंढवा परिसरातील एका टोळीशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.
आंदेकर टोळीतील १९ जणांची यादी
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर खुनाच्या बदल्याचा कट आखणे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी आंदेकर टोळीतील १९ जण सक्रिय होते. त्यांची यादी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तयार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.