- किरण शिंदेपुणे - शहरात गुन्हेगारी घटना वाढताना दिसत आहे. पुन्हा एकदा कोयत्याचा धाक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करत आहे. मंगळवारी मध्यरात्री येरवड्यातील कामराजनगर येथे अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने अनेक घरांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात आरोपीने चेहऱ्याला ओढणीने बांधून हातात कोयता घेऊन कामराजनगर परिसरातील घरच्या दारावर कोयत्याने वार केले आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:00 IST