शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"मी लस घेतली, पण फोटो करता नौटंकी करत नाही; कारण...", अजित पवारांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:22 IST

Ajit Pawar Take Corona Vaccine: कोरोनाच्या लसीकरणा संदर्भात माहिती देत असताना अजित पवार यांनी लस घेतल्याची माहिती दिली. पण यावेळी अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा पिकला.

Pune Corona Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यासोबतच पुण्यातील परिस्थिती अशीच कायम राहिली तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. याचवेळी कोरोनाच्या लसीकरणा संदर्भात माहिती देत असताना अजित पवार यांनी लस घेतल्याची माहिती दिली. (Ajit Pawar Takes Corona Vaccine)

...तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; अजित पवारांचा पुणेकरांना निर्वाणीचा इशारा

"देशाच्या पंतप्रधानांनी आता ४५ वर्ष वयाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं. मीही लस घेतलीय आणि तुम्हीही लसीकरण करुन घ्या", असं अजित पवार म्हणाले. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना तुम्ही केव्हा लस घेतली? याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी "मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी मी करत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहून लोक लस घेतील. पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत", असं अजित पवार म्हणाले आणि पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 

पुण्यात ३० मार्चपर्यंत कठोर निर्बंधअजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत यावेळी चिंता व्यक्त करत नागरिकांकडून नियमांचं अजूनही पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ३० एप्रिलपर्यंत पुण्यात निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. पण तोवरही कोरोनाची रुग्णसंख्या थांबली नाही. तर १ एप्रिल रोजी कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. 

पुण्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार?

  • रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार
  • नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील. 
  • लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद
  • उद्यान, बाग बगीचे फक्त सकाळीच सुरू राहणार
  • मॉल, मार्केट, चित्रपटगृह क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहणार
  • सार्वजनिक वाहतूक सुरूच राहणार
  • हॉटेलमध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी
  • हॉटेलात जेवण करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय वापरण्याच्या सूचना
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस