शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:50 IST

राज्यात कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या बाबतीत निर्बंधात शिथिलता आणण्याचा सरकारचा विचार : अजित पवार

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात येत्या सोमवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

मार्केट यार्डातील व्यापारी आणि शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दुकानांची वेळ ७ वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार असे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. त्यामुळे वेळ वाढवण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, पुणे शहराचा कोरोनाबाधित दर ३.९ इतका आहे. सध्या निर्बंध हे तिसऱ्या लेव्हलचे आहेत. तिसऱ्या लाटेचा दृष्टीने काम सुरू आहे, जिल्हा प्रशासनाने चांगली काम केले आहेत. शासनाने दुसऱ्या लाटेत झालेली सर्वाधिक रुग्णवाढपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाज ठेवून बेडचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने ज्यांनी लस घेतली नाही ते लस घेण्यास पुढे येतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.----जिल्ह्यात ५५ लाख लोकांचे लसीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. कोविड लसीकरणात ५५ लाखांचा टप्पा पार केला. एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे. मात्र, लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवार