पुणे : गेल्या चार महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती़. पण, मध्यरात्री काही तासात पडलेल्या तुफान पावसाने शहराला झोडपून काढले़. पहाटे शहरात पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते़. काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले़. वेधशाळेत ५५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली़. हवामान विभाग दर ३ तासांनी पावसाची नोंद घेते़. मध्यरात्री साडेअकरा वाजेपर्यंत पावसाने शुन्य नोंद होती़. त्यानंतर सकाळपर्यंत तब्बल ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
पुणे शहराला तुफान पावसाने मध्यरात्री झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:10 IST
काही तासात ५५.९ मिमी पाऊस : वडगाव शेरीत सीमा भिंत कोसळली...
पुणे शहराला तुफान पावसाने मध्यरात्री झोडपले
ठळक मुद्देपुणे शहरात आज सकाळपर्यंत १ जूनपासून तब्बल ९३० मिमी पावसाची नोंद