शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनसंख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:55 IST

महापालिकेच्या वाहनतळ धोरणामुळे गेले काही दिवस शहरातील वातावरण चांगलेच चिघळले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे तूर्तास हे धोरण बारगळले आहे.

ठळक मुद्देदररोज आठशे वाहनांची होते नोंदणी, वाहनतळशून्य कारभार गेल्या वीस वर्षांत दैनंदिन वाहन नोंदणीत अडीचपट वाढ

पुणे : शहरात एप्रिल ते जानेवारी २०१८ अखेरीस दररोज सरासरी तब्बल ७८८ वाहनांची नोंदणी प्रादशिक परिवहन विभाग, पुणेकडे (आरटीओ) झाली आहे. गेल्या वीस वर्षांत दैनंदिन वाहन नोंदणीत अडीचपट वाढ झाली आहे. परिणामी शहरातील लोकसंख्ये पेक्षाही वाहनांची संख्या अधिक झाली आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे वाहनतळाची जागाच बहुतांश रहिवासी इमारतींत ठेवली न गेल्याने हा प्रश्न अधिक उग्र झाला आहे.  महापालिकेच्या वाहनतळ धोरणामुळे गेले काही दिवस शहरातील वातावरण चांगलेच चिघळले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे तूर्तास हे धोरण बारगळले आहे. मात्र, त्या निमित्ताने शहरातील वाहनसंख्या आणि इतर मुद्दे चर्चिले गेले. ‘पुणे शहरात फेब्रुवारी २०१८ पर्यंत सुमारे ३६ लाख ५८ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात २६ लाख ८५ हजार दुचाकी आणि ६ लाख ४० हजार चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिचंवडमध्ये वाहनांची संख्या १७ लाख ८ हजार असल्याची माहिती’ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. गेल्या ७ वर्षांत लोकसंख्येत ४ लाखांची वाढ गृहित धरली, तरी शहरातील वाहनांची संख्या दरडोईपेक्षा अधिक आहे. शहरात १९९७ साली ६ लाख ४६ हजार ४५५ वाहने होती. त्या वर्षी १ लाख २१ हजार ११८ वाहनांची वाढ नोंदविण्यात आली होती. त्यावेळी दरदिवशी ३३३ वाहनांची नव्याने भर पडली. या एकूण वाहनसंख्येत ७० हजार १४६ चारचाकी आणि ४ लाख ७० हजार ९७४ दुचाकी होत्या. त्याची आजच्या वाहनसंख्येशी तुलना केल्यास वाहनसंख्येत ५ पट आणि दैनंदिन वाहन संख्येत अडीच पट वाढ झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. गेल्या वीस वर्षांत शहर फुगले आणि रस्त्यांची लांबी देखील वाढली. मात्र, सार्वजनिक वाहतुक सेवा आणि वाहनतळा विषयी ठोस धोरणच नसल्याने खासगी व सार्वजनिक वाहनतळाची जागा आकुंचित पावली. इमारती वाढल्या मात्र, वाहनतळाची जागाच ठेवली न गेल्याने ती वाहने सहाजिकच रस्ता नावाच्या हक्काच्या वाहनतळावर आली. आता शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यातूनच वाहनतळ धोरणाची मलमपट्टी लावली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर