शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

Pune: पुण्याची पुन्हा बाजी! स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहर देशात पहिल्या पाचमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 19:01 IST

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला देशातील ४ हजार ३२० शहरांमध्ये दहाव्या क्रमांकाचे तर १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकाचे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे (Swachh Bharat Mission, pune city, pmc)

पुणे : स्वच्छ भारत मिशन (Swachh Survekshan 2021) अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ स्पर्धेत, पुणे शहराने पुन्हा एकदा झेप घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात, पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर १७ व्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून ‘स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत’, देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी शनिवारी (दि़२०) जाहीर करण्यात आली़. यामध्ये यावर्षीही इंदोर शहराने प्रथम क्रमांक मिळविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा व चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई यांनी स्थान पटकावले आहे़.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला देशातील ४ हजार ३२० शहरांमध्ये दहाव्या क्रमांकाचे तर १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकाचे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक़ुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उप आयुक्त अनिल देशमुख, स्वच्छ सर्वेक्षण उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़ केतकी घाटगे यांनी हा सन्मान, नगरविकास मंत्रालयाचे सचिव महुआ यांच्याकडून  स्विकारला़ यावेळी पुण्याला राहण्यास उत्तम शहर (बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी) या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक व सीएफसी अंतर्गत थ्री स्टार मानांकनाने गौरविण्यात आले.

कोविड काळामध्ये पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था यांचे सांगीतिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव, यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असून, यापुढील काळातही लोकसहभागातून उत्तरोत्तर प्रयत्न करणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे़ तर लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, स्वच्छ संस्था, सिटीझम फोरम पुणेकर, यांचे या स्पर्धेत मोलाचा सहभाग मिळाला असल्याचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले. व्यवस्थापन करणाऱ्यांसह समस्त पुणेकरांचे हे श्रेय-

पुणे शहराला मिळालेले सर्वच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकीकडे कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे शहराच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देऊन, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करता आली याचे समाधान आहे. 'बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी'मध्ये आपल्या पुणे शहराने बाजी मारली. यात पुण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी पुणे शहराला एकूणच स्वच्छतेमध्ये १७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा यात मोठ्या सुधारणेसह देशात ५ वे स्थान प्राप्त झाले. शहर स्वच्छतेसाठी राबवणाऱ्या, व्यवस्थापन करणाऱ्यांसह समस्त पुणेकरांचे हे श्रेय आहे़. - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे़ 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड