शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Pune City Pollution: रस्ते खोदाईमुळे पुणे शहरात ध्वनिप्रदूषण अन् धुळीचे साम्राज्य; उपाययोजना करणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:40 IST

Pune City Pollution खोदकामाचा परिणाम वाहतुकीवरही जाणवू लागला असून कामासाठी लागणारे ट्रॅक्टर मशिनरी केबल रस्त्यांच्या कडेला येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे

संजय चिंचोले

पुणे : पुणे स्मार्ट सिटी प्रोजेक्टअंतर्गत शहरातील विविध भागांत फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यासाठी रस्ते खोदाईमुळे धुळीचे साम्राज्य आणि रस्ते खोदाईला वापरण्यात येणाऱ्या मशिनरीच्या तीव्र आवाजामुळे रहिवासी-व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पीएमसीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याच्या भावना पुणेकरकरांच्या वतीने व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी मुख्य अभियंत्याकडे प्राप्त होत आहेत. विशेष म्हणजे, ज्या भागात खोदकाम करावयाचे असेल त्याची माहिती पीएमसीच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांना देणे करारनाम्यात स्पष्ट असताना देखील संबंधित कंपनीकडून अवगत केले जात नाही. त्यामुळे शहरातील विविध भागांत होत असलेल्या खोदाईबाबत पथ विभागच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

शहरातील पारिजात ते वंडरसिटी, वेगा सेंटर ते वंडर सिटी, वंडर सिटी ते परमार पवन, मगरपट्टा ते एस. पी. इन्फोसिटी, वेगा सेंटर ते कोरेगाव पार्क, वेगा सेंटर ते परमार पवन, परमार पवन ते एस. पी. इन्फोसिटी, खराडी बायपास ते युआन आयटी पार्क, गेसका ते कोरेगाव पार्क, मारिप्लेक्स ते कोरेगाव पार्कसह शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांसह तब्बल ५१ ठिकाणी किमान ३५५ किलोमीटर शहराच्या विविध भागांत खोदाईसाठी तत्कालीन मुख्य अभियंता तथा विद्यमान शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी महाप्रितला परवानगी दिली आहे. दरम्यान, फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यासाठी दिवसा सुरू असलेल्या खोदकामामुळे पुण्यातील बहुतांश भागात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याशिवाय खोदकामासाठी डिझेल मशिनरीचा वापर केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते.

खोदकामाचा परिणाम वाहतुकीवर

खोदकामाचा परिणाम वाहतुकीवरही जाणवू लागला आहे. कामासाठी लागणारे ट्रॅक्टर मशिनरी केबल रस्त्यांच्या कडेला येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, तातडीने खोदाईबाबत पीएमसीच्या पथ व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची चर्चा पुणेकरांमधून उमटत आहे.

‘महाप्रित’ला दिली होती स्थगिती

पीएमसी आयुक्त नवल किशोर राम यांनी दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी ठराव क्रमांक ६/१२३१ नुसार महाप्रितच्या वतीने काम करणाऱ्या नवी मुंबई नेरूळ येथील दिनेश इंजिनिअरिंग लि. कंपनीला ऑप्टिक फायबर केबल्स टाकण्यासाठी ब्लॅंकेट मंजुरी दिली होती. ही परवानगी देताना पीएमसीच्या ट्रेचिंग पाॅलिसी गाईड लाईननुसार सुरक्षिततेविषयी आवश्यक उपाययोजना करून योग्य ती खबरदारी घेऊन कंत्राटदाराने खोदाई करणे बंधनकारक होते; परंतु कंत्राटदाराने खोदाई करताना पीएमसीने दिलेल्या ट्रेचिंग पाॅलिसी गाईड लाईननुसार बंधनकारक असलेल्या अटी, नियम धाब्यावर बसवले असल्याचे पीएमसी पथ विभागातील अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते. राडारोडा उचला जात नसल्याबाबत असंख्य तक्रारी पीएमसी पथ व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर पथ विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता तथा विद्यमान शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्र - क्रमांक - ८०४२ नुसार कंत्राटदार दिनेश इंजिनिअरिंग लि. यांना पूर्वी देण्यात आलेली खोदाई परवानगी रद्द केली होती.

खोदाईत पुन्हा तोच हलगर्जीपणा

पीएमसीने दिलेले नियम धाब्यावर बसवत २०० मीटरपेक्षा अधिक खोदाई केली जात आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यास व राडारोडा उचलण्यास विलंब केला जात आहे. खोदाई करण्यापूर्वी पथ विभागाकडे माहिती दडवली जात असल्याचे स्वतः मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी सांगितले. खोदाईदरम्यान पुणेकरांची गैरसोय केली जात आहे. नव्यानेच केलेल्या रस्त्यांवर बंदी घालण्यात आली असताना रस्ते व फुटपाथवर खोदाई केली जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर ताळ्यावर आलेल्या कंत्राटदाराने रस्ते व फुटपाथची दुरुस्ती केली, पण पहिल्याच अवकाळी पावसात त्यांची वाट लागल्याचे दिसून येत आहे. आता या कंपनीतील अभियंता पांडुरंग गोराडे यांना विचारणा केली असता नव्याने दुरुस्तीसाठी डांबर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

वाहतूक शाखा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी वर्दळीच्या वेळी दिवसा खोदाईला मनाई करणे आवश्यक असताना एनजीटीच्या निर्देशांची पायमल्ली केली जात आहे. एकीकडे पर्यावरणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पीएमसी एनजीटीच्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकडे बोट दाखवत बिल्डरांचे बांधकाम बंद पाडणे, कोट्यवधींचा दंड वसूल करते, मग दिवसा रस्ते बांधकामाच्या वेळी आणि खोदाईच्या वेळी धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्या निर्देशांचे पालन का करत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. - ॲड. निरंजन थोरात, उच्च न्यायालय, मुंबई.

रस्ते खोदाई करताना संबंधित कंपनीने आम्हाला अवगत करणे करारनाम्यानुसार बंधनकारक आहे, पण सदर कंपनी केवळ आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला रिपोर्टिंग करते. आपल्याकडील छायाचित्रे मला पाठवा. मी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देतो. - राजेश बनकर, मुख्य अभियंता, पीएमसी.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune choked by road digging: Noise, dust pollution soars; action needed.

Web Summary : Pune's road digging for fiber optics causes dust and noise pollution, disrupting life. PMC action is urged as contractors disregard guidelines, leading to traffic issues and public inconvenience. Repeated violations persist despite prior warnings.
टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यSocialसामाजिकTrafficवाहतूक कोंडी