पुणे शहरातील कचराप्रश्न अजून अधांतरीच; प्रलंबित प्रश्न, विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:42 AM2020-03-13T11:42:41+5:302020-03-13T11:44:35+5:30

पुण्यात निर्माण झालेली कचराकोंडीची समस्या सुटण्याची नाव घेत नाहीये..

Pune city garbage question still not solve | पुणे शहरातील कचराप्रश्न अजून अधांतरीच; प्रलंबित प्रश्न, विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय

पुणे शहरातील कचराप्रश्न अजून अधांतरीच; प्रलंबित प्रश्न, विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांची बैठक ; तोडगा निघाला नाही

पुणे : कचरा डेपो बंद करण्याविषयी उरुळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यामुळे निर्माण झालेली कचराकोंडी फुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच शहरात नऊ रुग्ण आढळल्याने या समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामस्थांसह प्रशासनाची बैठक घेतली. ती सकारात्मक झाली असली, तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावल्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 
या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह स्थानिक नगरसेवक, रणजित रासकर, किशोर पोकळे, संजय हरपळे, बाळासाहेब हरपळे, विशाल हरपळे, विशाल भाडळे, कचरा डेपो संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. बायोमायनिंग प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, प्रलंबित विकासकामांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. कचरा डेपोवर टाकणारा कचरा बंद करा, नवीन प्रकल्प सुरू करू नका, बाधित शेतकऱ्यांच्या ५७ कुटुंबांपैकी राहिलेल्या १४ जणांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. २००९ पासून सुरू असलेल्या आंदोलनामधून काही साध्य झाले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी करतानाच ग्रामपंचायतीचाच मिळकत कर ठेवावा, अशा मागण्या आहेत.
..........
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांची बैठक घेतली. विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामस्थ आग्रही आहेत. आम्ही त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असून त्यांच्या प्रश्नांविषयी कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा बैठका घेऊन निर्णय घेतले जातील. सकारात्मक चर्चा झाली असून मार्ग निघेल. - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे 
...................
अंमलबजावणीचे दिले आश्वासन 
आंदोलन मागे घेण्याची महापौरांची विनंती ग्रामस्थांनी अमान्य केली. पालिकेने लेखी पत्र देऊन त्यांची सर्व कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी मुदतीची मागणी केली आहे. विकासकामांसह कचरा डेपोसंदर्भात कृती आराखडा करून त्यावर अंमलबजावणीचे आश्वासन देणारे पत्र दिले आहे. या पत्रावर चर्चा करून शुक्रवारी निर्णय कळवू, असे ग्रामस्थांनी सांगितले.
.........

Web Title: Pune city garbage question still not solve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.