पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य

By राजू हिंगे | Updated: September 18, 2023 10:34 IST2023-09-18T10:33:22+5:302023-09-18T10:34:07+5:30

शहर उपाध्यक्षपदी 18 जणांची, सरचिटणीस पदी आठ जणांची तर चिटणीस मध्ये 18 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे...

Pune city BJP's jumbo executive announced, preference given to former corporators | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य

पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य

पुणे :पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहे. उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही कार्यकारणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारणी केव्हा जाहीर करणार याबद्दल उत्सुकता होती अखेर काही दिवसानंतर ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

शहर उपाध्यक्षपदी 18 जणांची, सरचिटणीस पदी आठ जणांची तर चिटणीस मध्ये 18 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ तर महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नामदेव माळवदे आणि अनुसूचित जाती मोर्चाअध्यक्षपदी भीमराव साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्षपदी इम्तियाज मोमीन तर व्यापारी आघाडी अध्यक्षपदी उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Web Title: Pune city BJP's jumbo executive announced, preference given to former corporators