पुणे : महायुतीत अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप असे तिन्ही येऊन सध्या काम करत आहेत. त्यांच्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नेहमीच राजकीय विनोदी किस्से पाहायला मिळतात. एकमेकांना सहज चिमटे काढले जातात. देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना सांभाळून घेत असतात. अशाच एक किस्सा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आज पुण्यात घडला आहे.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात भाषण सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले आहेत.
कार्यक्रम सुरु झाल्यावर सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने मंचावर दोन दादा आहेत असं म्हणाले होते. एका अजित दादा आणि दुसरे रोहित दादा आहेत. त्यानंतर महिलेने चंद्रकांत दादा पण आहेत असं म्हणत सर्व दादांचा उल्लेख केला. त्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत दादांना टोमणे मारले आहेत. तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाहीत त्यांना कोल्हापूरचेच वाटतात. असं म्हणून चिमटे काढले. कदाचित अजून देखील त्यांना ते कोल्हापूरचे आहे असं वाटत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं अजितदादा म्हणाले आहेत. त्याच वेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असा टोला अजितदादांना लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपण एकत्र येणार होतो तेव्हाच ठरलं होतं की मीच पालकमंत्री असेल. असे बोलून अजित पवारांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.