शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव! पुणेकरांची सायंकाळ वाहतुक कोंडीत; खासगी कंपनीच्या अहवालातून बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 06:00 IST

साधारणपणे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतुक कोंडीचा पुणेकरांना करावा लागतो सामना

ठळक मुद्दे‘टॉमटॉम’ या कंपनीने २०१९ मध्ये जगातील ५७ देशातील ४१६ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास वाहतुक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे शहर जगात पाचव्या स्थानावर

पुणे : भारतात राहण्यासाठी सर्वात सुलभ शहर म्हणून गौरविण्यात आलेल्या पुणे शहरातील वाहतुकीची स्थिती मात्र गंभीर बनली आहे. पुणेकरांची दररोजची सायंकाळ वाहतुक कोंडीत जात आहे. साधारणपणे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कोंडी उच्चांग गाठते, असे एका खासगी कंपनीच्या अहवालातून समोर आले आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी ११५ टक्के जादा वेळ लागल्याचे या संस्थेच्या पाहणीतून पुढे आले आहे. ‘टॉमटॉम’ या कंपनीने २०१९ मध्ये जगातील ५७ देशातील ४१६ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास केला आहे. त्याचा अहवाल कंपनीकडून नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार वाहतुक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे शहर जगात पाचव्या स्थानावर आले आहे. यावरून पुणे  शहराची वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनल्याचे दिसून येते. अहवालानुसार, कोंडीमुळे सरासरी ६३ टक्के जादा वेळ लागत आहे. तसेच अहवामध्ये आठवड्यातील सातही दिवसांची मध्यरात्री १२ ते रात्री ११ या प्रत्येक तासाची वाहतुक कोंडीमुळे लागणाºया जादा वेळेची टक्केवारी दिली आहे. त्यामध्ये दिवसभरात सायंकाळी ५ ते ८ या तीन तासांमध्ये सर्वात जास्त कोंडी होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कोंडी उच्चांकी पातळीवर जाते. यावेळेमध्ये खासगी, सरकारी कार्यालयातून घरी परतणारे चाकरमाने, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गर्दी, खरेदीसह हॉटेलिंग, फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडणारे पुणेकर यांमुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत जाते. परिणामी, बहुतेक प्रमुख रस्त्यांवर कोंडी पाहायला मिळते. रविवारी व शनिवार या दोन दिवशी बहुतेक कार्यालये, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने ही कोंडी काही प्रमाणात कमी असते. अहवालातील आकडेवारीनुसार, मागील वर्षी शुक्रवारी कोंडीत सरासरी ११५ टक्के एवढा उच्चांकी वेळ लागला आहे. याच दिवशी वर्षभरातील प्रत्येक दिवस सर्वाधिक कोंडीचे ठरले आहेत. तर रविवार हा सर्वात कमी कोंडीचा वार ठरला आहे. सकाळी प्रामुख्याने ९ ते ११ ही वेळ कोंडीची असली तरी सायंकाळच्या तुलनेत हे प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. तर शनिवारी दुपारनंतर रात्री ९ वाजेपर्यंत कोंडीमुळे लागणारा जादा वेळ जवळपास सारखाच आहे. -------------------२०१९ मधील सर्वाधिक कोंडीचा दिवस (जादा वेळ ९३ टक्के) - २ आॅगस्ट २०१९ मधील सर्वात कमी कोंडीचा दिवस (जादा वेळ ३० टक्के) - २७ आॅक्टोबरशहरातील कोंडीमुळ लागणारा सरासरी जादा वेळ - ६३ टक्केमहामार्ग व शहरातील रस्त्याची केलेली पाहणी - ४,३२,४७.८२८ किलोमीटर शहरी भागातील रस्त्यांची पाहणी - ३,०६,१७,४६३ (एकाच रस्त्याची अनेकदा पाहणी केल्याने हे अंतर वाढले आहे.)

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरPMPMLपीएमपीएमएल