शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:30 IST

दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे

पुणे : राज्यात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. पावसाअभावी शेताची अनेक कामे राहिल्याने बळीराजा चिंतेत दिसू लागला होता. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. पुण्याच्या चारही धरणातपाणीसाठा कमी होऊ लागला होता. त्यामुळे महापालिकेने पाणी कपातीचा निर्णयही घेतला. पण रविवारपासून शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. कालही माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. आज मात्र पहाटेपासूनच पावसाच्या धुव्वादार बॅटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी उठून कामाला जाणाऱ्या पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे. दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे. 

शहरात सकाळीच नागरिक विविध कामासाठी बाहेर पडतात. पण पावसामुळे रस्त्यावर गर्दी दिसून आली नाही. पण रस्त्यावर अनेक ठिकणी पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. मुलांची सुद्धा शाळेत जाताना गडबड दिसून येत होती. सततच्या पावसाने वातावरणात थंडावाही जाणवू लागला आहे. राज्यात सर्वदूर पावसाने आता जोर पकडला असून, येत्या चार दिवसांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  येत्या तीन दिवसांत शहरात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

धरण क्षेत्रात झालेला पाऊस 

हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार रात्री साडेआठ वाजता शिवाजीनगर येथे २.८, लोहगाव येथे ८, लवळे येथे ४.५ तर चिंचवड येथे ११.५ मिमी पाऊस पडला. दुसरीकडे धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे १०, पानशेत येथे २१, वरसगाव येथे २० तर टेमघर येथे ३० मिमी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात येत्या तीन दिवसांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.  

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीDamधरणTrafficवाहतूक कोंडी