शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Pune By-Election: कसब्यात काँग्रेसमध्येच होणार धुमशान; तर भाजपात उमेदवारीसाठी उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 19:25 IST

पुण्यात पोटनिवडणूक जाहीर होताच काँग्रेससह भारतीय जनता पक्ष तसेच अन्य राजकीय पक्षांमध्येही जोरदार राजकीय हालचाली सुरू

पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होताच काँग्रेससह भारतीय जनता पक्ष तसेच अन्य राजकीय पक्षांमध्येही जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून धुमशान होण्याची चिन्हे आहेत तर भाजपतील इच्छुकांची भाऊगर्दी पक्षश्रेष्ठींकडे डोळे लावून बसली आहे. अन्य राजकीय पक्षांचे सध्या देखते रहो सुरू असून संधी मिळाली तर तेही आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे तसेच पक्षाचे सहयोगी सदस्य असलेले रविंद्र धंगेकर यांच्यात उमेदवारीवरून धुमशान होईल असे दिसते आहे. शहराध्यक्ष असलेले शिंदे हेच मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला तरी ते दुसऱ्या क्रमाकांचे उमेदवार होते. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे ते जाहीरपणे सांगत असले तरी उमेदवारी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. धंगेकर यांनीही कसब्यातूनच त्याआधीच्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी केली होती. त्यावेळी ते फक्त ८ हजार मतांनीच पराभूत झाले होते. त्यामुळे ते आता उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टिने त्यांनी मोर्चेबांधणीलाही सुरूवात केली आहे.

भाजपत तर उमेदवारी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यापासून ते माजी सभागृह नेते असलेले गणेश बीडकर, धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे असे अनेकजण इच्छुक आहेत. याच मतदारसंघातून सलग ५ वेळा विजयी झालेले विद्यमान खासदार गिरीश बापट हेही त्यांची स्नुषा स्वरदा बापट यांच्यासाठी शब्द टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचे निश्चित केले तर या सर्वांचेच ताबूत थंड होणार आहेत. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात काहीही जाहीर भाष्य केले नसले तरी पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मत शैलेश यांना उमेदवारी मिळेल असेच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्ष किंवा पक्षाच्या नेत्यांनी काहीही मत व्यक्त केलेले नसले तरी आपण उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे स्वत:च जाहीर केले आहे. त्या मनसेतून राष्ट्रवादी मध्ये आल्या आहेत. मनसेनेही तत्कालीन शहराध्यक्ष अजय शिंदे यांना मागील विधानसभा निवडणुकीतून कसब्यात उतरवले होते. त्याशिवाय शिवसेनेतून बंडखोरी करत विशाल धनवडे यांनीह उमेदवारी केली होती. मात्र सध्या तरी रुपाली पाटील-ठोंबरे किंवा धनवडे, शिंदे यांनी जोर उमेदवारीसाठी जोर लावलेले दिसत नाही. आप व अन्य पक्ष चुप्पी ठेवून आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकMukta Tilakमुक्ता टिळकgirish bapatगिरीष बापटBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस