शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: अज्ञातांचा गोळीबार, बिल्डर देवेंद्र शहांचा मृत्यू; खंडणी प्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 14:11 IST

बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता गोळीबार केला, यामध्ये देवेंद्र शहा यांचा मृत्यू झाला आहे.  प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ७ मध्ये सायली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

पुणे: प्रभात रस्त्यावर  शनिवारी रात्री अज्ञातांकडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल शहा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंन्द्रभाई शहा हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे. अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहा हे त्यांच्या प्रभात रोडवरील गल्ली नंबर 7 सायली अपार्टमेंट येथील राहत्या घरी होते. यावेळी दुचाकीवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपार्टमेंटमधील खाली असलेल्या इस्त्री दुकानदाराला शिविगाळ करून शहा यांना खाली बोलवून आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार शहा यांना सांगितला. हे ऐकूण शहा आणि त्यांचा मुलगा दोन्हीही लिफ्टमधून खाली आले. शहा बाहेर येताच दोन्ही आरोपींनी लागोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शहा यांच्या कमरेत आणि दुसरी छातीत लागली. गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहा यांना तातडीने पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान,याप्रकरणी रात्री उशिरा डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या वस्तीत घडलेल्या या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेPoliceपोलिस