शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

Pune Breaking : कोरोनाच्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:19 IST

कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

ठळक मुद्देउत्पीपी मॉडेल, डीपी रस्ते विकसन, कॅन्सर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला प्राथमिकता

लक्ष्मण मोरे- 

पुणे : कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटींनी फुगविण्यात आले असून उत्पन्नाचा सर्वाधिक भार मिळकत कर विभागावर टाकण्यात आला आहे. यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून पीपीपी मॉडेलद्वारे रस्ते विकसीत करणे, डीपी रस्त्यांचे विकसन करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला 7 हजार 649 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने तब्बल 720 कोटी रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी (सन 2020-21) 7 हजार 390 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. रासने यांनी ऑनलाईन सभेद्वारे मांडलेल्या 2021-22 च्या अंदाजपत्रकामध्ये प्रभावी महसूल वाढ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विषयक खर्चांवर लक्ष देण्यात आले असून वैद्यकीय महाविद्यालयासाठी 146 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रक्तपेढी उभारणे, नवीन कार्डीअ‍ॅक रुग्णवाहिका घेणे, अपघात विमा योजना यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच मध्यवर्ती भागासह शहराच्या कोणत्याही भागात 10 रुपयांमध्ये दिवसभरात वातानुकुलीत बस प्रवास योजना तसेच पाच रुपयात प्रवास योजनेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. गतिमान वाहतुकीसाठी मेट्रो, स्वारगेट-कात्रज बीआरटी, एचसीएमटीआर, नगर रस्त्यावर उड्डाणपूल उभारणे, डीपी रस्ते आणि पूल खासगी सहभागातून विकसीत करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच शिवणे-खराडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बालभारती पौड फाटा रस्ता या प्रलंबित रस्त्यांसाठीही तरतूद देण्यात आली आहे.समान पाणी पुरवठा योजना, भामा-आसखेड, नदी सुधारणा, समाविष्ट 11 गावांमध्ये मलवाहिन्या विकसित करणे, मुळा-मुठा नदीकाठ विकसन, जांभुळवाडी तलावाचा पीपीपी तत्वावर पुनर्विकास यालाही अंदाजपत्रकात स्थान देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी छोटे छोटे प्रक्रिया प्रकल्प उभारणे, पर्यावरण संवर्धन याविषयीही तरतूद देण्यात आली आहे. खासगी सहभागातून महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, सारसबाग आणि पं. नेहरु स्टेडियम परिसर, मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय, के. के. मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे.

या योजनांच्या अंमलबजावणीसाठी  महसुल वाढीची आवश्यकता आहे. त्याकरिता मिळकतकराची साडेचार हजार कोटींची थकबाकी वसुल करण्यावर भर देण्यात येणार आहे. कराच्या कक्षेत न आलेल्या मिळकती शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणले जाणार असून मिळकत कर आकारणीतील गळती थांबविण्यात येणार असल्याचे रासने म्हणाले. यासोबतच पाणीपट्टीची थकबाकीही वसुल केली जाणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षांनी नियमित कर भरणा-या नागरिकांना मिळकतकरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. पालिका प्रशासनाने 2021-22 च्या अंदाजपत्रकामध्ये गृहीत धरलेल्या उत्पन्नामध्ये स्थायी समितीने भरमसाठ वाढ केली आहे. पालिकेच्या उत्पन्नाच्या इतर पयार्यामधून प्रशासनाने 854 कोटी उत्पन्न अपेक्षित धरले होते. यामध्ये स्थायी समितीने  50 कोटींची वाढ केली आहे. तर, बांधकाम शुल्कामध्ये 200 कोटींनी वाढ करण्यात आली आहे. मिळकराच्या उत्पन्नात 300 कोटींची वाढ गृहीत धरण्यात आली आहे.====

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्पMayorमहापौरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस