शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:17 IST

गुन्हे शाखेचे पोलिस पथक आणि पोलिस स्टेशन त्याचा शोध घेत आहेत.

- किरण शिंदेपुणे - येरवडा चौकात मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्र भाग्यश ओसवाल हा गाडीत बसून होता. या भाग्यश ओसवालला आता पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपींपैकी भाग्यश ओसवाल नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर दुसरा गौरव आहुजा सध्या फरार आहे. गुन्हे शाखेचे पोलिस पथक आणि पोलिस स्टेशन त्याचा शोध घेत आहेत.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, येरवडा घटनेतील मुख्य आरोपी गौरव अहुजाने  थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. ही गाडी गौरव मनोज अहुजाच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्याने मोबाईल बंद केला असून कुटुंबासह पोलीस त्याचा शोध घेत आहे. अशात हा तरुण कोण आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे.रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने  क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYerwadaयेरवडा